स्वंते पाबो यांना २०२२ चे नोबेल पारितोषिक जाहीर…

स्वीडन, ४ ऑक्टोबर, २०२२ : जगातले सर्वोच्च मानाचे समजले जाणारे नोबेल पारितोषिक यंदा स्वंते पाबो यांना वैद्यक शास्त्रासाठी देण्यात आले. चाळीस हजार वर्षापूर्वी नामशेष झालेल्या मानवी प्रजातींचे त्यांनी यशस्वी संशोधन केले. त्यांच्या या अनोख्या कार्यासाठी त्यांना २०२२ च्या नोबेल पुरस्काराने नावजण्यात आले. स्वंते पाबो हे यांनी विलुप्त होमिनिन आणि मानवी उक्रांतीच्या अनुवंशिक जीनोम यावर संशोधन केले. या अनोख्या संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

स्वंते पाबो यांच्या कारकिर्दीविषयी ….

स्वंते पाबो, जर्मनीतील लिपझिंग येथील मॅक्स प्लॅक्स इन्स्टिट्यूट फॉर रेव्हॉल्युशनरी एन्थ्रोपोलॉजी येथील मेंजेनेटिक्स विभागाचे संचालक म्हणून काम पहात आहेत. पाबो हे अनुवंशिक शास्त्रज्ञ म्हणून काम पहात आहेत. निएंडर थल जीनोमवर त्यांनी काम पाहिले आहे. त्यानुसार ते अनुवंशिक जीनोमवर काम करत आहेत.
निएंडरथल ही अनेक वर्षापूर्वीची मानवी प्रजाती असून पाबो यांनी त्यावर संशोधन केले आहे. जर्मनीतील निएंडर व्हॅलीत ही या प्रजातीची काही हाडे सापडल्यामुळे या प्रजातीला निएंडरथल मानव असे नाव देण्यात आले.

या मानव प्रजातीची काही वैशिष्टे –

या मानवी प्रजातीची उंची ४.५ ते ५.५ एवढी होती. केसांचा रंग काळा आणि त्वचा पिवळी होती. १.२५ लाख वर्षापासून ही प्रजाती अस्तित्वात होती. पश्चिम युरोप, अफ्रिका अशा प्रांतात या लोकांचे वास्तव्य होते.

स्वंते पाबो यांनी या संशोधनातून या प्रजातीच्या अस्तित्वावर प्रकाशझोत टाकल्यामुळे अनेक वर्षापूर्वी मानवी प्रजाती अस्तित्वात असल्याचा पुरावा आता मिळाला आहे. त्यामुळे अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. त्यामुळे स्वंते पाबो यांच्या नोबेल पारितोषिकाने आता निएंडर मानवी प्रजातीची अनेक रहस्य समोर येणार आहे, हे खरं.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा