२०३० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याचे भारतीय रेल्वेचे लक्ष्य

नवी दिल्ली, १३ जुलै २०२० : भारतीय रेल्वेने दहा वर्षांच्या कालावधीत हरित रेल्वे होण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. सन २०३० पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवले आहे. ग्रीन रेल्वेचा दर्जा मिळवण्यासाठी रेल्वेने ग्लोबल वार्मिंग कमी करण्यासाठी आणि हवामान बदलांचा प्रतिकार करण्यासाठी बराच पुढाकार घेतला आहे . रेल्वेचे विद्युतीकरण, गाड्यांची उर्जा कार्यक्षमता सुधारणे, प्रतिष्ठापन व स्थानकांसाठी ग्रीन प्रमाणपत्र, कोचमध्ये बायो टॉयलेट बसविणे आणि उर्जेच्या अक्षय स्त्रोतांकडे जाणे हे निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्यासाठी रेल्वेच्या रणनीतीचा भाग आहेत.

भारतीय रेल्वेने ४० हजाराहून अधिक मार्ग किलोमीटरचे विद्युतीकरण पूर्ण केले जे एकूण ब्रॉडगेज मार्गांच्या ६४ टक्के आहे. मागील सहा वर्षात १८ हजार सहाशे किलोमीटरहून अधिक विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वेने या आर्थिक वर्षासाठी सात हजार किलोमीटरच्या मार्गाचे विद्युतीकरण लक्ष्य निश्चित केले आहे. सन २०२३ च्या अखेरीस ब्रॉडगेज नेटवर्कवरील सर्व मार्गांचे विद्युतीकरण करण्याचे नियोजन केले गेले आहे. एकूणच, कोविड साथीच्या आजारात ५ किलोमीटर लांबीचे मोठे कनेक्टिव्हिटी काम सुरू करण्यात आले आहे.

भारतीय रेल्वे देखील सौर आणि पवन ऊर्जेला प्रोत्साहन देत आहे. एक मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पांना कार्यान्वित केले गेले आहे आणि ४०० मेगावाट प्रकल्प अंमलबजावणीच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. याव्यतिरिक्त, रेल्वे धावणा-या गाड्यांसाठी जमीन-आधारित सौर प्रतिष्ठानांमधून वीजनिर्मिती करण्याचा प्रयत्न करीत आहे. रेल्वेकडे २० हजार गीगा वॅट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प उभरण्यासाठी ५१ हजार हेक्टर जमीन उपलब्ध आहे. भेल यांच्या सहकार्याने मध्य प्रदेशातील बीना येथे १.७ मेगा वॅटचा एक प्रकल्प यापूर्वीच बसविला गेला आहे.

पवन ऊर्जा क्षेत्रात राजस्थान, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात यापूर्वीच १०३ मेगावॅटच्या पवन-आधारित उर्जा प्रकल्प सुरू झाले आहेत. तामिळनाडू, गुजरात, राजस्थान आणि कर्नाटकमध्ये येत्या दोन वर्षांत २०० मेगावाट पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याची रेल्वेने योजना आखली आहे. रेल्वेने इमारती आणि स्थानकांच्या शंभर टक्के एलईडी प्रदीपनसारखे इतरही हरित उपक्रम सुरू केले आहेत. दोन लाख ४४ हजाराहून अधिक बायो टॉयलेटसह एकूण ६९ हजार डबे बसविण्यात आले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा