देशात गेल्या २४ तासात २,१४१ नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली , २० ऑक्टोबर २०२२: गुरुवारी आरोग्य विभागाकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार देशात २ हजार १४१ नवे रुग्ण आढळून आले. कालच्या दिवशी २० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ४ कोटी ४६ लाख ३६ हजार ५१७ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत ५,२८,९४३ जणांनी आपला जीव गमावला आहे.

तर आतापर्यंत ४ कोटी ४० लाख ८२ हजार ०६४ रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशात २५,९६८ ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, देशातील रिकव्हरी दर आता ९८.७६ टक्क्यांवर आहे तर देशाचा दैनिक पॉझिटिव्हिटी रेट ०.८५ टक्क्यांवर आहे.

महाराष्ट्रात ४१८ नवे रुग्ण, तीन मृत्यू

राज्यात मागील २४ तासात ४१८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर कालच्या दिवशी ५१५ रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

राज्यात आतापर्यंत ७९ लाख ७७ हजार ६११ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१४ % इतके आहे.

राज्यात ओमिक्रॉनचे १८ रुग्ण

मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक होताना दिसत आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर वाढत्या रुग्णसंख्येबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान, महाराष्ट्रात १८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये पुण्यात सर्वाधिक म्हणजेच १३ रुग्ण, नागपूर आणि ठाण्यात प्रत्येकी दोन आणि अकोला जिल्ह्यात एका रुग्णाची नोंद झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा