सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा २१वा दीक्षांत समारंभ पुढे ढकलला

पुणे २७ जुलै २०२४ : भारताच्या माननीय राष्ट्रपतींचा महाराष्ट्र दौरा पुढे गेल्याने सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा २१वा दीक्षांत समारंभही पुढे ढकलण्यात आलाय. भारताच्या माननीय राष्ट्रपतींच्या कार्यालयाने देखील सिंबायोसिस विद्यापीठाला कळविले आहे की, अपरिहार्य परिस्थितीमुळे दिनांक २९ जुलै २०२४ रोजी नियोजित दीक्षांत समारंभाचे निमंत्रण स्वीकारणे पुढे ढकलण्यात आले आहे.

पुणे शहर व परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि धरणांतून पाणी सोडल्यामुळे, सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे दिनांक २९ जुलै २०२४ रोजी होणारा दीक्षांत समारंभ पुढे ढकलण्याचा हा कठीण निर्णय विद्यापीठाला घेणे भाग पडले आहे. सध्याची हवामान परिस्थिती आणि सतत प्रतिकूल परिस्थिती दर्शविणारे अंदाज लक्षात घेता, हा निर्णय घेणे हेच प्रत्येकाच्या हिताचे आहे असा आमचा विश्वास आहे. आमचे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा आणि कल्याण आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. असे सिंबायोसिस विद्यापीठाने कळविले आहे.

२१ व्या दीक्षांत समारंभासाठी विद्यापीठाने सर्व तयारी केली आहे. इतर सर्व व्यवस्थेसह विद्यापीठ कॅम्पसमध्ये एक मोठा मांडव उभारण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक मैलाचा दगड म्हणून दीक्षांत समारंभाचे महत्त्व लक्षात घेता ही बातमी विद्यार्थी व पालकांसाठी नक्कीच निराशाजनक आहे परंतु सिंबायोसिस विदयापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी नंतरच्या तारखेला दीक्षांत समारंभाचे नियोजन करेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : जयश्री बोकील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा