बिस्किटांच्या पाकिटात २२ लाखांचे परदेशी चलन, मुंबई विमानतळावर जप्त

नवी दिल्ली, १४ ऑक्टोंबर २०२२ : केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंबई महानगर पालिका, गुजरात विधानसभा आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुक जाहीर होण्याची शक्यता होती. पण निवडणूक आयोगानं केवळ हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. ही घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखा सांगितल्या आहेत. १२ नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशात मतदान होणार आहे. तर ८ डिसेंबर रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. हिमाचल प्रदेशात एकूण ५५०७२६१ मतदार आहेत. त्या पुरुष मतदार २७८०२०८ तर महिला मतदार २७२७०१६ आहेत. तर सर्व्हिस मतदार ६७५३२, पीडब्ल्यूडी मतदार ५६ ०००१, बुजुर्ग मतदार १२२०८७ आहेत. तर पहिल्यांदा मतदान करणारे १८६६८१ मतदार असल्याचं राजीव कुमार यांनी सांगितलं आहे.

आपला उमेदवार कोण आहे? त्याची माहिती काय आहे हे मतदारांना माहिती मिळावे म्हणून सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात येणरा आहे. उमेदवारांची माहिती जाणून घेण्याचा सर्व नागरिकांना अधिकार आहे. उमेदवारांना प्रचारादरम्यान तीन वेळा वर्तमानपत्रं आणि टीव्ही चॅनेलवर आपल्याबाबतची जाहिरात द्यावी लागणार आहे, असं निवडणूक आयोगाने सांगितल आहे.

तसेच मतदान केंद्र सुरक्षित आणि सहज ठेवले जाणार आहेत. सर्व मतदान केंद्र तळमजल्यावरच असतील. पाणी, वेटिंग शेड, टॉयलेट आणि विजेची सुविधाही असणार आहे, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक दरवर्षी पेक्षा वेगळी आणि निर्णायक ठरणार आहे. कारण राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा परिणाम या येत्या महानगरपालिका निवडणुकांवर दिसणार आहेत. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणुका होणार असल्याची माहिती शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दिली होती. त्याअनुषंगानं आजच्या निवडणुक आयोगाच्या पत्रकार परिषदेत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची देखील घोषणा होईल अशी शक्यता होती, तर मुंबई महानगर पालिका आणि गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख दिवाळीनंतर घोषित केल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा