२३०० कोटींचा गैरव्यवहार : रॅनबॅक्सीच्या माजी प्रवर्तकाला अटक

नवी दिल्ली: रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक मलविंदर सिंह यांना मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
रॅनबॅक्सी हि औषध निर्माण क्षेत्रातील नामांकित कंपनी असून रेलिगेयर फिनवेस्ट लिमिटेडटच्या (आरएफएल) फंडमध्ये करण्यात आलेल्या २३०० कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
मलविंदर सिंह यांच्यासोबत रेलिगेयर एंटरप्रायजेजचे माजी सीएमडी सुनील गोधवानी यांनाही अटक करण्यात आली आहे.
सध्या दोघेही एका घोटाळ्याप्रकरणी तिहार जेलमध्ये असून ईडीने त्यांना तिथेच अटक केली असल्याची माहिती संबंधित वकिलांनी दिली.
दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मलविंदर यांना त्यांचा भाऊ शिविंदर, गोधवानी, कवी अरोरा आणि अनिल सक्सेना यांना ऑक्टोबर महिन्यातच अटक केली होती.
डिसेंबर २०१८ मध्ये रेलिगेयर फिनवेस्ट लिमिटेडने दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केल्यामुळे पोलिसांनी प्रकरणाशी संबंधितांना बोलावून चौकशी करून जेरबंद केले होते.
दरम्यान, देशात आर्थिक अपहाराच्या वाढत्या घटनांमध्ये आता रॅनबॅक्सीच्या प्रकरणाची भर पडल्याने, आर्थिक क्षेत्राला धक्का बसला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा