गोल पोस्ट महाराष्ट्र राज्यातील २४ तासातील रुग्णवाढ.

राज्यातील २४ तासातील रुग्णवाढ.


मुंबई, ७ ऑगस्ट २०२०: राज्यात गेल्या २४ तासात ११,५१४ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर ३१६ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात १,४६,३०५ केसेस अॅक्टिव्ह आहेत. महाराष्ट्रात करोना रुग्णांची एकूण संख्या ४,७९,७७९ इतकी आहे. यापैकी ३,१६,३७५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात आत्तापर्यंत करोनाची बाधा होऊन १६,७९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील करोना रुग्णांचा मृत्यू दर हा ३.५० टक्के झाला आहे. आत्तापर्यंत पाठवण्यात आलेल्या २४,८७,९९० पैकी ४,७९,७७९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ९,७६,३३२ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३७,७६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version