गोल पोस्ट आरोग्य राज्यातील २४ तासातील कोरोना आपडेट

राज्यातील २४ तासातील कोरोना आपडेट

मुंबई, १३ ऑगस्ट २०२०: राज्यात गेल्या २४ तासात १२,७१२ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ३४४ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

सध्या १,४७,५१३ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत, राज्यात पुन्हा एकादा आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येने १३,४०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यभरात कोरोनाचे एकूण ३,८१,८४३ रुग्ण बरे झाले आहेत.

आज देखील नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांचीच संख्या अधिक असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९.६४ टक्के एवढे आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version