२४ तासातील राज्याची कोरोना रुग्णवाढ……

मुंबई, २ ऑगस्ट २०२०: राज्यात गेल्या २४ तासात ९,६०१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ३२२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज दिवसभरात १०,७२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर सध्या १,४९,२१४ रुग्णांवर ॲक्टिव्ह उपचार सुरू आहेत.

दरम्यान आतापर्यंत २,६६ ,८८३ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६१.८१ टक्के आहे. तसेच एकाच दिवसात ६४,८४५ राज्यात कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

कोरोनाचा राज्यातील प्रवास हा सध्या असाच सुरु आसून रुग्णसंख्येबरोबर बरे होऊन घरी जाणा-या रुग्णांची संख्या हि दिवसेंदिवस वाढत चालली असून ती राज्यासाठी एक दिलासादायक बाब आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा