भिंड, ६ जुलै २०२० : मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील अजनाळ गावात राहणा-या १५ वर्षीय रोशनी भदौरियाने मध्य प्रदेश राज्य मंडळाने घेतलेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९८.५ टक्के गुण मिळवून राज्यात आठवा क्रमांक मिळविला आहे.
रोशनी रोज फक्त शाळेत जाण्यासाठी दररोज २४ किलोमीटर प्रवास सायकलवरून करत होती असे तीने सांगितले .
रोशनी म्हणाली की , “मला सरकारने सायकल दिली ज्याचा मी चांगला वापर केला. मी दररोज साडेचार तास अभ्यास करत असे. भविष्यात मला आयएएससाठी तयारी करायची आहे,” रोशनी म्हणाली की. तिला इतके चांगले गुण मिळण्याची कधीच अपेक्षा नव्हती, परंतू परीक्षेसाठी तीने परिश्रमपूर्वक अभ्यास केला होता. वडिलांच्या सततच्या पाठिंब्यामुळे ती अभ्यासाकडे पूर्ण लक्ष देवू शकली.
शेतीव्यवसाय करणारे रोशनीचे वडील पुरषोत्तम भदोरिया म्हणाले की, त्यांच्या मुलीने खरोखरच खूप परिश्रम केले याचा कुटुंबातील सर्वांनाच अभिमान आहे. तिची आई सरिता भदोरिया म्हणाली की तिला मुलगी शिकून मोठी झालेली बघायची आहे आणि तीला आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न साध्य करायचे आहे. मध्य प्रदेशच्या दहावी राज्य बोर्डने शनिवारी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी