गोल पोस्ट इतर राजकारण विरोधी आघाडीच्या बैठकीत २४ पक्ष सामील होणार, आठ नवीन पक्षांचा समावेश

विरोधी आघाडीच्या बैठकीत २४ पक्ष सामील होणार, आठ नवीन पक्षांचा समावेश

नवी दिल्ली, १२ जुलै २०२३: बंगळूर येथे येत्या १७-१८ जुलै रोजी होणाऱ्या विरोधी आघाडीच्या बैठकीस २४ विरोधी पक्ष सामील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला चितपट करण्याचे उद्दिष्ट ठेवत, विरोधी आघाडी मजबूत करण्यासाठी संयुक्त जद नेते नितीश कुमार तसेच काँगेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पुढाकार घेतला आहे.

विरोधी आघाडीच्या पाटणा येथे झालेल्या पहिल्या बैठकीस १६ पक्ष उपस्थित राहिले होते. तर बंगळूर येथे होणाऱ्या बैठकीत ८ नवीन पक्ष सामील होणार आहेत. नवीन पक्षांमध्ये तमिळनाडूतील एमडीएमके, केडीएमके, व्हीसीके तसेच आरएसपी यांचा समावेश आहे. याशिवाय ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, आययुएमएल, केरळ काँगेस हेही सामील होणार आहेत. विशेष म्हणजे बैठकीस काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही उपस्थिती असणार आहे.

नवीन विरोधी पक्ष आघाडीच्या बैठकीस हजर राहणार आहेत, त्यातील एमडीएमके व केडीएमके यांनी याआधीची लोकसभा निवडणूक भाजपच्या सोबतीने लढली होती. बंगळूर बैठकीसाठीचे निमंत्रण पत्र याआधीच खर्गे यांनी विरोधी नेत्यांना पाठविलेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version