देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे २,४०१ नवे रुग्ण, २१ मृत्यू

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर २०२२: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची नवीन आकडेवारी जारी केलीय. देशात २ हजार ४०१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २१ रुग्णांचा मृत्यू झालाय. शनिवारी २,४३० नवे रुग्ण आढळून आले होते तर १७ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर मागील २४ तासांत देशातील कोविड रुग्णांमध्ये २९ रुग्णांची घट नोंदवण्यात आलीय.

सध्यस्थितीत २६,६२५ रुग्णांवर उपचार सुरू

देशात कोरोनाच्या प्रादुर्भावात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत देशात २ हजार ३७३ रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झालेत. तर एकूण रुग्णांची संख्या ४ कोटी ४६ लाख २८ हजार ८२८ वर पोहोचली आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या २६ हजार ६२५ वर पोहोचलीय.

दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ४ कोटी ४० लाख ७३ हजार ३२५ रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलंय. तर देशातील एकूण कोरोना बळींची संख्या ५ लाख २८ हजार ८९५ वर पोहोचली. असे असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.७६ टक्के इतके आहे.

दरम्यान, काल दिवसभरात ५ लाख २ हजार ६१९ लसींचे डोस देण्यात आले. तर आतापर्यंत देशातील २१९ कोटी २२ लाख १८ हजार जणांना लस देण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा