कर्जत,दि.२० मे २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यात आरोग्य विभागासह सर्व प्रशासकीय यंत्रणा अत्यंत चांगले काम करत आहेत. त्यामुळेच तालुक्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. यापुढे ही आढळू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना. आरोग्य यंत्रणा मात्र सर्व शक्यता गृहीत धरून तयारी करत आहेत. त्यांना साथ म्हणून विविध सामाजिक संघटना पुढे येत आहेत.
कर्जत तालुक्यातील पेट्रोल डिझेल वितरक संघटनेच्यावतीने उपजिल्हा रुग्णालयास २५ फोल्डिंग बेड भेट देण्यात आले. प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचेता यादव, डॉ मधुकर काळदाते यांना सुपूर्द करण्यात आले.
यावेळी डीवायएसपी संजय सातव, पो नि सुनील गायकवाड, गटविकास अधिकारी अमोल जाधव, नगर पंचायत मुख्याधिकारी गोविंद जाधव, कर्जत तालुका पेट्रोल डिझेल वितरक दादासाहेब फाळके, हर्ष शेवाळे, अनुज काळदाते, सचिन लांगोरे, अशोक अनारसे, विपुल दोशी, डॉ अंकुश कदम, संतोष पारेख, प्रवीण तापकीर, डी. एस. सोनवणे, आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ.यादव यांनी वितरकांचे आभार मानताना उपजिल्हा रुग्णालयाला काही औषधाची आवश्यकता असून ती सामाजिक संघटनांनी उपलब्ध करून द्यावीत असे आवाहन केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष