१ ते १२ वीचे २५% अभ्यासक्रम कमी…..

मुंबई, दि. २६ जुलै २०२०: कोरोना मुळे विद्यार्थांचे शैक्षणिक वर्ष हे फार कसोटीचे चालले असून, प्रशासन देखील त्यासाठी युद्धपातळीवर कार्य करत आहेत. प्रशासनाने तोडगा काढत ऑनलाइन शिक्षण सुरु केले आणि त्यामधे देखील राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आणखी एक माहिती दिली आहे.

कोव्हीड -१९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी १ ते १२ वी साठी २५% अभ्यासक्रम कमी करण्याच्या राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण प्रस्तावास शासन मान्यता देण्यात आली आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हि माहिती दिली आहे. शाळा सुरु नाहीत आणि त्यात विद्यार्थाच्यां मनावर कुठल्याही पद्धतीचे मानसिक ताण आथवा दडपण येऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ही त्यांनी सांगितले.

प्रशासनाने वार्षिक शिक्षणामध्ये खंड पडू नये, म्हणून त्यांनी ऑनलाईन शिक्षण सुरु केले खरे मात्र, त्यामध्ये देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहरी विद्यार्थांसाठी हा निर्णय चांगला आसून ग्रामीण भागात आजुनही काही विद्यार्थी हे शिक्षणापासून दुर आसल्याचे दिसत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा