सोलापूर, दि.१० जून २०२०: जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रांझणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्ताने २५५ रक्तदात्यानी रक्तदान केले. माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे, करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे जिल्हा परिषद सदस्य रणजित शिंदे व सभापती विक्रम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर पार पडले. संपूर्ण माढा तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गटामधे हे अभियान राबविले.
आपल्या देशात व राज्यामध्ये कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव झालेला असून केंद्र व राज्यशासन कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहे.अशा स्थितीमध्ये कोरोना बाधीत तसेच इतर रूग्णांवर उपचारादरम्यान मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासत असल्याने सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी माढा तालुक्यामध्ये दि.१ ते १० जून या कालावधीमध्ये ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले असून १५०० ते २००० रक्ताच्या पिशव्या संकलन करण्याचा मानस आहे.
रक्तदान शिबिरास प्रारंभ झालेला असून आज भिमानगर गटामध्ये कारखान्याचे सभासद,वाहनमालक, मिळुन आतापर्यंत २५५ रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे तसेच विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यामार्फत रक्तदान करणा-या रक्तदात्यांना एक हॅन्ड सॅनिटायझर बॉटल व मास्क वाटप करण्यात येत आहेत.
सदर प्रसंगी जिल्हा दुध संघाचे मा.सदस्य शिवाजी पाटील,कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय पाटील भिमानगरकर,वेताळ जाधव, कैलास तोडकरी, माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील, हिम्मत सोलनकर, धनाजी जवळगे, अंकुश चंदनकर, घाडगे आबा, सचिन देशमुख, अमर जाधव,नितीन मस्के,स्वातीताई पाटील,वसंत पाटील,धर्मराज पाटील, रामभाऊ शिंदे, भारत चंदनकर, चंद्रकात गिड्डे, उजनीचे सरपंच संतोष मेटे,संतोष चव्हाण मुख्य शेती अधिकारी संभाजी थिटे, मुख्य ऊस विकास अधिकारी महेश भादुले, शेती अधिकारी सुनिल बंडगर, ऊस पुरवठा अधिकारी महेश चंदनकर,किरण मोरे,संतोष पाटील अॅग्रीओव्हरसिअर राजमाने व कर्मचारी उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील