गोल पोस्ट गुन्हा डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर 29 जणांचा बलात्कार

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर 29 जणांचा बलात्कार

मुंबई, 24 सप्टेंबर 2021: साकीनाका बलात्कार प्रकरणात पीडित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आता डोंबिवली येथे एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवली पूर्वेला मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून राज्य सरकारला जाब विचारण्यात येतोय. पीडित मुलगी 14 वर्षांची अल्पवयीन आहे. आरोपींचा शोध सध्या सुरु आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी हा सगळा प्रकार उघडकीस आला. डोंबिवलीच्या भोपर परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन अल्पवयीन मुलांसह 23 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आरोपींमध्ये काही राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने जानेवारीमध्ये बलात्कार करताना व्हिडीओ काढला आहे. या व्हिडीओच्या आधारे मुलीला ब्लॅकमेल केलं जात होतं. यानंतर मुलीला फार्म हाऊसवर नेऊन आरोपींकडून आळीपाळीने बलात्कार करण्यात आला. बुधवारी हा सगळा प्रकार उघडकीस आला असून मानपाडा पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version