मुंबई, दि. ६ मे २०२०: कोरोनाचा आकडा हा रोजच वाढताना दिसत आहे. आजची आकडेवारी सरकारने जारी केली आहे. दि. ६ मे म्हणजेच आज सकाळ १० पर्यंतची माहिती अशी, पूर्ण भारतात आत्ता पर्यंत ४९,३९१ प्रकरणे आढळून आली आहेत. यामध्ये गेल्या २४ तासात २९५८ नवीन प्रकरणे वाढली आहेत. भारतात आत्तापर्यंत १६९४ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्यात गेल्या २४ तासात १२६ नवीन मृत्यू समोर आले आहेत.
महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर आत्ता पर्यंत १५,५२५ प्रकरणे आढळून आली आहेत. यामध्ये गेल्या २४ तासात ८४१ नवीन प्रकरणे वाढली आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ६१७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्यात गेल्या २४ तासात ३४ नवीन मृत्यू समोर आले आहेत. मृत्यू दर बघितली तर भारताचा ३.४३% आहे तर महाराष्ट्राचा ३.९७% इतका आहे. कालच्या प्रकरणांपेक्षा आज महाराष्ट्रात नवीन रुग्ण सापडण्याचा आकडा वाढला आहे. काल हाच आकडा ७७१ एवढं होता.
२५,००० खाजगी डॉक्टरांना सक्तीने हजर राहण्याचे आदेश:
आजपासून मुंबईतील २५,००० खाजगी डॉक्टरांना सरकारी रुग्णालयात काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात सरकारने तसे पत्र आणि फॉर्म खाजगी डॉक्टरांना पाठवले आहेत. तसेच सेवा न देणाऱ्या डॉक्टरांचे लायसन्स कॅन्सल करण्याचे अधिकारही सरकारकडे आहेत. त्यामुळे आता खाजगी डॉक्टरांना सरकारी रुग्णालयांमध्ये सेवा द्यावीच लागणार आहे.
कोणत्या राज्यात किती प्रकरणे:
पश्चिम बंगाल १३४४
मेघालय १२
गुजरात ६२४५
मध्य प्रदेश ३०४९
हिमाचल प्रदेश ४२
कर्नाटक ६७१
महाराष्ट्र १५,५२५
राजस्थान ३१५८
तेलंगणा १०९६
झारखंड १२५
आसाम ४३
आंध्र प्रदेश १७१७
उत्तर प्रदेश २८८०
पंजाब १४५१
उत्तराखंड ६१
दिल्ली ५१०४
हरियाणा ५४८
जम्मू आणि काश्मीर ७४१
चंदीगड १११
तामिळनाडू ४०५८
केरळ ५०२
बिहार ५३६
ओडिशा १७५
अंदमान निकोबार ३३
अरुणाचल प्रदेश १
छत्तीसगड ५९
दादर नगर हवेली १
गोवा ७
लडाख ४१
मणिपूर २
मिझोराम १
पुडुचेरी ९
त्रिपुरा ४३
एकूण ४९,३९१
न्यूज अनकट प्रतिनिधी