हिंगोली जिल्ह्यात ३.६ रिश्टर स्केलचा भूकंप, ७ मिनिटांच्या अंतराने दोनदा हादरे

हिंगोली, १५ जुलै २०२३ : हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी ७ वाजून ४ मिनिटांनी ३.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. अनेक गावांतून मोठा आवाज झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या पहिल्या धक्क्यानंतर पुन्हा ७ वाजून १२ मिनिटांनी पुन्हा एकदा हादरा बसला आहे.

जिल्ह्यात मागील चार ते पाच वर्षांपासून भुगर्भातून आवाज येण्याचे प्रकार नित्याचेच झाले होते. अचानक जमिनीतून गडगडाटाचा आवाज येऊन जमीन हादरण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहे. सुदैवाने आजपर्यंत या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आज सकाळी भुगर्भातून मोठा आवाज झाला. त्यानंतर सात मिनिटांनी लगेचच म्हणजे सात वाजून बारा मिनिटांनी दुसरा आवाज झाला.

जिल्ह्यातील पिंपळदरी, आमदरी, राजदरी, सोनवाडी, जामगव्हाण, कंजारा, पुर, काकडदाभा, हिंगणी, खेड यांसह परिसरातील गावांमधून मोठा आवाज झाला, तर हिंगोली शहरापर्यंत यांचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलमध्ये या भुकंपाची तीव्रता ३.६ एवढी नोंदवली गेली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा