९ कोटींच्या फसवणूकीच्या प्रकरणात ३ पत्रकारांना अटक

उत्तर प्रदेश, दि. १४ जून २०२०: उत्तर प्रदेशात पशुधन खात्याशी करार करून देण्याच्या नावावर फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आले आहे. यूपीमध्ये ९ कोटींच्या या फसवणूकीच्या प्रकरणात तीन पत्रकारांना अटक करण्यात आली आहे. पशुपालक विभागाबरोबर करार करण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांनी इंदूर मधील एक व्यापारी मनजीत सिंग यांच्याकडून नऊ कोटी रुपये घेतले होते.

संतापलेल्या व्यावसायिकाने पोलिसांत तक्रार दिली व त्यानंतर रविवारी रात्री दहा वाजता अनेक कडक कलमांखाली खटला दाखल करण्यात आला. या प्रकरणात मंत्र्यांचे खाजगी सचिव व इतर अधिकाऱ्यांचा देखील संबंध असल्याचे समोर आले आहे.

फसवणूक करणाऱ्या पैकी एक आशिष राय या व्यक्तीने स्वतःला विभागाचा संचालक एस. के. मित्तल म्हणून सांगितले होतं. या व्यक्तीने खोटी ओळख सांगून प्रथम फसवण्यास सुरुवात केली. नंतर याची खात्री पटवून देण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले. हजरतगंज कोतवाली येथे संपूर्ण प्रकरणात ११ जणांविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

फसवणूक करणार्‍यांची ही टोळी २०१८ पासून सक्रिय आहे. या टोळीने अनेकांना फसवले आहे. फसवणूक झालेल्या व्यक्तीला जेव्हा असे वाटू लागले की आपल्याकडे असलेले आता सर्व पर्याय बंद होत चालले आहे तेव्हा त्यांनी पोलिसांना सांगण्याचे ठरवले

फसवणुकीच्या या प्रकरणाचे धागेदोरे आता मुंबईशी जोडले गेले असल्याचे देखील समोर आले आहे. या फसवणूकीच्या प्रकरणात आजमगडचा एक कुख्यात गुंड सामील आहे. यापूर्वी मागासवर्गीय विभाग, खाण विभाग आणि मूलभूत शिक्षण विभागातील मंत्र्यांचे खाजगी सचिवही भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरूंगात गेले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा