मुंबई, ३ नोव्हेंबर २०२० : कृषि विद्यापीठांमार्फत नव्यानं संशोधित केलेल्या सुधारीत आणि संकरीत वाणांच्या प्रसारासाठी कृषि विभागामार्फत रब्बी हंगामासाठी ३ लाख १४ हजार क्विंटल बियाणांचं अनुदानावर वाटप करण्यात येणार असून त्यासाठी ६२ कोटी ७९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असं कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी काल सांगितलं.
विविध योजनेंतर्गत गहू, हरभरा, मका, रब्बी ज्वारी, करडई, जवस या पिकांसाठी पिक प्रात्यक्षिकं आणि अनुदानित दरानं बियाणं पुरवठा यासाठी ३ लाख १३ हजार ६८६ क्विंटल बियाण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.
१० वर्षाच्या आतील वाणांच्या बियाणासाठी गव्हावर प्रति क्वींटल २००० रुपये, हरभरा २५०० रुपये, संकरित मका ७५०० रुपये आणि रबी ज्वारी प्रति क्विंटल ३००० रुपये अनुदान मिळेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी