लातूर, दि.२जून २०२०: लातूर जिल्ह्यातील एकमेव शासकीय हमीभाव केंद्रात खरेदी करण्यात आलेला कापूस हा अचानक आलेल्या पावसाने भिजून गेला आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
पानगांव (ता.रेणापूर) येथे जिल्ह्यातील एकमेव शासकिय हमी भाव कापूस खरेदी केंद्र आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेला सातशे क्विंटल कापूस याठिकाणी ठेवण्यात आला होता. मात्र सोमवारी(दि.१) रोजी रात्रीअचानक आलेल्या पावसात हा कापूस भिजल्याने तीस लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये, यासाठी पानगांव (ता.रेणापूर ) येथील व्यंकटेश कॉटन जिनिंग अँण्ड प्रेसिंग येथे लातूर जिल्हयातील शासकीय हमी भाव कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. अहमदपूर, जळकोट आदी भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडे ऑनलाईन पध्दतीने आजपर्यंत जवळपास चार हजार सातशे शेतकऱ्यांनी नोंद केली आहे.
सोमवारी पडलेल्या पावसात खरेदी केलेला ६०० ते ७०० क्विंटल कापूस भिजून अंदाजे ३० लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे व जिनिंगचे मालक राहूल चव्हाण यांनी स्वत:च्या ताडपत्र्या झाकण्याकरिता दिल्याने अधिक होणारे नुकसान टळल्याचे कापूस खरेदी केंद्र प्रमुख व ग्रेडर .नरहरे एस.एन यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी: