मुंबई: नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना आशिष शेलार म्हणाले की, ३० नोव्हेंबर पर्यंत आम्ही १७० किंवा त्यापेक्षा जास्त आमदारांचे बहुमत राज्यपालांना समोर जाहीर करू.
संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देत ते म्हणाले की, “संजय राऊत हे रात्र आणि सकाळ यातील करक विसरले आहेत. आमच्यासाठी सकाळी सहाची वेळ ही राम प्रहारची आहे तर संजय राऊत यांच्यासाठी ती रात्र आहे. यासारखे दुर्दैव या महाराष्ट्राचे नाही”. पुढे उद्धव ठाकरे यांच्या वर बोलताना त्यांनी म्हटले की, “राजकीय स्वार्थासाठी उद्धव ठाकरे यांनी आपला आयोध्या दोरा सुद्धा रक्त केला फक्त राजकीय स्वार्थासाठी ते चक्क भगवान राम यांना सुद्धा विसरू शकतात आश्चर्याची गोष्ट आहे.
देवेंद्र फडणवीस आणि पवार हे या महाराष्ट्रात एक स्थिर सरकार आणतील याचा आम्हाला विश्वास आहे असेही ते म्हणाले. बोलताना त्यांनी संघाचाही उल्लेख केला त्यात ते म्हणाले की, सकाळी सहा वाजता शपथविधी होणे हे आमच्यासाठी रामप्रहरी झालेली एक शुभ घटना आहे सकाळी सहाची वेळ ही आमचे शाखा भेटीची वेळ आहे हे संजय राऊत यांना काय कळणार.