अहमदपूर, लातूर ११ डिसेंबर २०२३ : अहमदपूर येथील भाजपा महिला मोर्च्याच्या वतीने, अहमदपूर येथील छ.शिवाजी महाराज चौकात ११ डिसेंबर रोजी सकाळी काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार धिरज प्रसाद साहु यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून त्याचे दहन करण्यात आले.
खासदार धिरज प्रसाद साहु यांच्या घरी आय.टी छाप्या मध्ये ३५३ कोटी रूपये सापडले असून त्यांच्या वरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या वेळी करण्यात आली. या प्रसंगी भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, जिल्हाध्यक्ष्य दिलीपराव देशमुख, भाजपा महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस रेखाताई हाके,
सौ.भाग्यश्री क्षिरसागर,झानोबा बडगीरे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी, तालुका अध्यक्ष प्रताप पाटील, डॉ.सिध्दार्थकुमार सुर्यवंशी आदी नेते तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी : सलीम शेख













































.jpeg?updatedAt=1725544140003)