पुणे, २२ ऑक्टोबर २०२२ : मागील काही दिवसांपासून पुण्यामध्ये वारंवार होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यावर आता पुणे पोलीस आयुक्तांनी ठोस पाऊल उचलले आहे.वाहतूक कोंडीला मनुष्यबळाचे देखील कारण दिले जात होते.त्यामुळे पोलीस आयुक्तांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अतिरीक्त ३०० कर्मचारी वाहतूक शाखेला देत वाहतूक नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे शहर पोलीस दलातील वाहतूक शाखेच्या कारवाई ब्रेक केल्यावरही वाहतूकची परिस्थिती आहेतशिच राहील्याने उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी वाहतूक शाखेचा सर्व कारभार कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यांकडे सोपवून वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांना वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना रिपोर्ट करण्याचे आदेश दिले असून कारभार पारदर्शक ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्याकडे वाहतूक शाखेची जबाबदरी देण्यात आली आहे. तर वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे हे नवटके यांना वेळोवेळी वाहतूक शाखेच्या कामकाज व कर्तव्याचा अहवाल सादर करतील असे आदेशदेण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अतिरीक्त ३०० कर्मचारी देखील वाहतूक शाखेला देण्यात आले आहेत. त्यामुळे आता शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
शहरामध्ये वाहतूक कोंडीने पुणेकर त्रस्त आहेत. परंतु वाहतूक पोलीस चौकातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याऐवजी आपला कोपरा धरून दंड वसूलीवर भर देत असल्याचे दिसून आले. दिवाळी सनामुळे शहरात वाहतूक कोंडी होत असतानाही हे वाहतूक पोलीस रस्त्यांवर थांबत नसल्याचे दिसून आल्यावर सह पोलीस आयुक्तांनी दंडात्मक कारवाई बंदीचे आदेश देत रस्त्यांवर उभा राहून वाहतूक नियंत्रण करण्यास सांगितले. पण, त्याचा परिणाम वाहतूक शाखेवर झाला नाही.
आता वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अतिरीक्त ३०० कर्मचारी वाहतूक शाखेला देऊन वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे पुढील काळात रस्त्यांवर वाहतूक पोलीस उभा असल्याचे पाहिला मिळणार असून, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर