सोलापूर, दि. ९ मे २०२०: अर्थव्यवस्थेचा रुतलेला गाडा पुन्हा सुरळीत करण्यासाठी सरकारने उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याला अनुसरून सोलापूर जिल्ह्यातील लॉकडाऊन नंतर बंद करण्यात आलेले कारखाने सरु होत आहेत. सध्या जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम असे ३२३ औद्योगिक प्रकल्प सुरु झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत बंद करण्यात आलेले औद्योगिक प्रकल्प सुरु करण्यासाठी http://permission.midcindia.org या संकेतस्थळावर अर्ज करायचा होता. अर्ज केलेल्या ५६७ औद्योगिक प्रकल्पापैकी सर्वांना प्रकल्प सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकी ३२३ औद्यागिक प्रकल्प सुरु झाले असून त्यामध्ये ७१५२ कामगार आहेत.
कामगारांची ने-आण करण्यासाठी पाच वाहनांना सुरक्षा पास देण्यात आले आहेत. १४० औद्योगिक प्रकल्पांनी ३८८ वाहनांसाठी पासची मागणी केली आहे. मात्र अद्याप या वाहनांना पास देण्यात आले नसल्याचे समन्वय अधिकारी महाव्यवस्थापक बी. टी. यशवंते यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी