माळेगाव मध्ये जुगार अडयावर धाड, ३३ जण अटक

बारामती, दि. ५ जुलै २०२० : बारामती तालुक्यातील माळेगाव येथे रविवारी दि ५ रोजी पोलिसांना खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीवरून बारामती तालुका पोलीस ठाणे हद्दीतील माळेगाव गावातली रमाबाई नगर ता. बारामती येथे रमण गायकवाड हा व्यक्ती जुगारीचा क्लब चालवत असून त्याच्याकडे जूगार खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येत असल्याची माहिती मिळाल्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना मिळाली. त्यांच्या आदेशाने माळेगाव येथील एका बंगल्यात बेकायदा पत्त्याचा अड्डडा सुरू असून येथे मोठ्या प्रमाणावर पैशावर जुगारचा खेळ सुरू आहे.अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर या बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकला असता या ठिकाणी जुगारअड्डा मालक रमण गायकवाड याच्यासह एकूण ३३ जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी धाडीमध्ये रोख रक्कम सह ७ दुचाकी व १ चारचाकी गाडया, टेबल, खुर्च्या तसेच जुगाराचे साहित्य असे एकूण ९,७०,०४० रुपयांचा मुद्देमाल व आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपींविरुध्द बारामती तालुका पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाई मध्ये अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर पोलीस उपनिरीक्षक संदीप गोसावी, पो.हवा. सुरेश भोई, पो.ना रमेश केकाण, आप्पा दराडे, वैभव साळवे, गणेश काटकर, राहूल लाळगे, दत्तात्रय गवळी तसेच आर.सी.पी. पथक क्रमांक ३ मधील श्रीकांत गोसावी, रज्जाक मणेरी, आबा जाधव, सचिन दरेकर, अमोल चितकुटे, सागर कोरडे, सुजीत शिंदे, प्रियंका झणझणे, मेघा इंगळे, मंगल बनसोडे या कारवाई मध्ये सहभागी झाले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा