जळगावच्या चोपडा तालुक्यातील अडावद येथे ३५ वर्षीय तरूणाचा खून

चोपडा, जळगाव ३ ऑक्टोबर २०२४ : जळगावच्या चोपडा तालुक्यातील अडावदच्या लोखंडे नगरातील रहिवासी बापू हरी महाजन, या ३५ वर्षीय तरूणाचा लाकडी दांडका तसेच दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडलीय. या घटनेनंतर दोन संशयित तरूणांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपासासाठी जळगाव येथील श्वान पथकाला बोलवून कारवाई करण्यात आली.

या तरूणाचा खून नेमका कश्या मुळे झाला हे जरी गुलदस्त्यात असले. तरी तालुक्यातील अडावद परिसरात एका महिन्यात खूनाची ही तिसऱ्यांदा घटना घडल्याने संपुर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. मृत बापू हरी महाजन याचे शव चोपडा येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आलय.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आत्माराम पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा