धारावी झोपपट्टीतील ३७ हजार जण क्वारंटाइन

मुंबई, दि१६ मे २०२० : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणजे धारावी हे कोरोनाचे व्हॉटस्पॉट ठरत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. या परिसरात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. आतापर्यंत ३७,००० जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

धारावीत शुक्रवारी ८४ नव्या रुग्णांची भर पडली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुग्ण संख्या आता धारावीत ११४५ वर पोहोचली आहे. एकूण ५३ जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून धारावीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतातानाच दिसत आहे. धारावीसारख्या झोपडपट्टीत कोरोनाचा संसर्ग हा वाढत आहे. यासाठी प्रशासन अनेक उपाय योज़ना करत आहे. पण अगदी दाटीवाटीच्या या झोपडपट्टीत कोरोना वेगाने पसरत आहे.

रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तब्बल ३७ हजारांहून अधिक धारावीकरांना अलगीकरणात ठेवण्याची वेळ पालिकेवर आली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा