गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा पुण्यातून नांदेडचे ३८ मजूर आपल्या घरी रवाना: जिल्हाधिकारी

पुण्यातून नांदेडचे ३८ मजूर आपल्या घरी रवाना: जिल्हाधिकारी

पुणे, दि.८ मे २०२० : पुणे जिल्ह्यात अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील ३८ मजूरांना सर्व प्रक्रिया पूर्ण करुन तीन वाहनांमधून आज (शुक्रवारी) पुण्यातून त्यांच्या घरी पाठविण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम व नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी समन्वय साधून मजुरांना पाठवण्याबाबत एकमेकांना परवानगी दिली.
त्यांना पाठविण्यापूर्वी ग्रामीण मुळशी तालुक्यामध्ये लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे, उद्योगधंदे सुरु करण्यात आले आहे. आपल्या हाताला मिळणारे काम खंडित होणार नाही, याची त्यांना कल्पना देण्यात आली. मात्र, ते थांबण्यासाठी तयार नसल्यामुळे, आज या मजुरांना रवाना करण्यात आले.

तहसील कार्यालयातर्फे प्रत्येक प्रवाशाला ऑरेंज ज्यूसची बॉटल सोबत देण्यात आली. प्रशासनाकडून योग्य ती दक्षता घेऊन सोशल डिस्टनसिंग पाळून त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली. या ३८ प्रवाशांना नांदेड जिल्ह्यात पाठविण्यासाठी कासार आंबोली ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, तलाठी श पासलकर, मंडळ अधिकारी सुहास कांबळे यांनी नियोजन केले.
मुळशी तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण व पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी या तीनही वाहनांतील मजूरांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version