अफगाणिस्तानातील फैजाबाद येथे भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर ४.३ तीव्रता

फैजाबाद, १३ फेब्रुवारी २०२३ :तुर्की आणि सीरीयात भूकंपाने हाहाकार माजवलेला असतानाच आता अफगाणिस्तानातील फैजाबादमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. अफगाणिस्तानशिवाय सिक्कीममध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घराबाहेर पडले.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, आज सकाळी ६ वाजून ४७ मिनिटांनी अफगाणिस्तानच्या १०० किमी दक्षिणपूर्व स्थित फैजाबादला भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.३ इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपानंतर येथे गोंधळ उडाला, लोक घराबाहेर पडले.

  • सिक्कीममध्येही भूकंप

त्याचबरोबर भारतातील सिक्कीमच्या ईशान्येकडील राज्यातील युकसोमच्या वायव्येला ७० किमी अंतरावरही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.३ आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, सोमवारी पहाटे ४ वाजून १५ मिनिटांनी हा भूकंप झाला. सध्या अफगाणिस्तान आणि सिक्कीममध्ये जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा