पुणे, 2 ऑक्टोंबर 2021: जगात सुपर पॉवरचा गौरव करणाऱ्या चीनला विजेच्या तीव्र टंचाईला सामोरं जावं लागत आहे. यामुळं या देशाची सुमारे 10 कोटी लोकसंख्या अंधारात आहे. सर्वात मोठी समस्या येथील उद्योगांना भेडसावत आहे जे त्यांचा माल परदेशात पुरवतात.
वीज कपातीमुळे ऍपल आणि टेस्लासारख्या मोठ्या कंपन्यांच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे. या कंपन्यांना कंप्यूटर चिप्ससह इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं पुरवठादारांना त्यांच्या अनेक कारखान्यांमधील काम थांबवावं लागलं आहे. याचा थेट परिणाम मागणी आणि पुरवठ्यावर होतो. 10 पेक्षा जास्त तैवानच्या कंपन्यांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतलाय.
ऍपल आणि टेस्ला पुरवठा करणाऱ्या तीन तैवान इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी रविवारी सांगितलं की, वीज पुरवठा खंडित झाल्यामुळं त्यांना चीन स्थित त्यांच्या कंपन्यांचं काम बंद करण्यास भाग पाडलं गेलं.
ऍपलचा पुरवठादार युनिमिरोन टेक्नॉलॉजीने म्हटलंय की चीनमधील त्याच्या तीन उपकंपनींना कामकाज थांबवावं लागलं आहे. ते म्हणाले की, या कंपन्यांचं काम थांबवल्यानं जास्त नुकसान होणार नाही, कारण इतर कारखान्यांमध्ये उत्पादन वाढवण्यात आलं आहे.
वीजपुरवठा ठप्प होण्यामागं दोन मोठी कारणं
चीनमधील वीज संकटामागं दोन प्रमुख कारणं सांगितली जात आहेत. पहिलं कोळसा कमी करणं आणि दुसरे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचं कार्बन उत्सर्जन धोरण. खरंच, राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्याचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कोळसा उत्पादन कमी केलं आहे. त्यांना 2060 पर्यंत चीनला कार्बनमुक्त देश बनवायचा आहे. यासाठी त्यांनी कोळशाचं उत्पादन कमी केलंय.
4 प्रांतांवर ब्लॅकआउटचा परिणाम
चीनमधील ब्लॅकआउटचा परिणाम 4 प्रांतांवर होत आहे. चीनच्या सरकारी ग्लोबल टाइम्सच्या मते, दक्षिण चीनमधील ग्वांगडोंग आणि ईशान्य चीनमधील हेलोंगजियांग, जिलिन आणि लियाओनिंगमध्ये वीज खंडित होणं ही समस्या कायम आहे. इतर अनेक क्षेत्रांनाही ही समस्या भेडसावत आहे.
सरकारने या क्षेत्रांतील अनेक उद्योगांना वीज वापरामध्ये कपात किंवा कामकाजाचे दिवस कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्टील, अॅल्युमिनियम, सिमेंट आणि खताशी संबंधित उद्योगांना सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक भागात परिस्थिती अशी आहे की, ट्रॅफिक सिग्नल देखील आठवडाभरापासून बंद आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे