कर्मयोगी कारखान्याचे ४ लाख २५ हजार मे. टन गाळप पुर्ण: हर्षवर्धन पाटील

7

इंदापूर, १८ डिसेंबर २०२०: कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने चालु सन २०२०-२१ या ऊस गळीत हंगामामध्ये आज (दि.१८ ) अखेर ४ लाख २५ हजार १३० मे.टन गाळप पुर्ण करून ऊस गाळपात आघाडी घेतली आहे. सध्या दररोज सुमारे ९,००० ते ९,१०० मे.टन क्षमतेने गाळप केले जात आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व उपाध्यक्षा श्रीमती पदमाताई भोसले यांनी दिली.

चालू हंगामात कारखान्याने १४ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, ४५० ट्रक – ट्रॅक्टर, ४०० ट्रॅक्टर गाडी व ३५० बैल गाड्या मार्फत संपूर्ण तोडणी प्रोग्रॅम संगणकीकृत पणे राबविण्यात येत आहे. प्रत्येक पंधरवड्याला ऊस बिलाचा हप्ता नियमितपणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा केला जात आहे, असे त्यांनी नमूद केले.

कर्मयोगी कारखान्याने ऊस गाळपात जिल्ह्यात आघाडी घेतल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. कार्यकारी संचालक, सर्व अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक सभासद शेतकरी, तोडणी व वाहतूकदार यांच्या प्रयत्नाने आणि हितचिंतकांच्या प्रेरणेने चालू हंगामात ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल, असा विश्वासही हर्षवर्धन पाटील व उपाध्यक्षा श्रीमती पदमाताई भोसले यांनी व्यक्त केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा