केंद्र सरकारकडून चार लाख रुपये भरपाई देण्याचा निर्णय मागे

नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाचा विषाणू वेगाने पसरत असल्याचे सध्या चित्र आहे. सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकारने कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केले आहे. याशिवाय देशात कोरोना विषाणूमुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास मृतांच्या कुटूंबाला चार लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केंद्रीय गृह मंत्रालयाने केली होती. मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतलेला हा निर्णय मागे घेतला असल्याचे समजते आहे.
आता केंद्र सरकारने कोरोना बळींच्या कुटूंबीयांना मदत देणार नाही तर केवळ कोरोना विषाणू लागू झालेल्या रूग्णाच्या उपचारासाठीच ही मदत केली जाणार असल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा