२०२५ मध्ये आता FASTag चे ४ नवे नियम

21

मुंबई, १८ फेब्रुवारी २०२५ : बहुतेक लोक वाढत्या ट्राफिकमुळ टोल प्लाझावर लांबच लांब रांगा टाळण्यासाठी FASTag वापरतात. कारण आता वास्तविक,’ नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे ‘ नवीन FASTag बॅलन्स व्हॅलिडेशन नियम लागू केले जातायेत. FASTag चे हे नवीन नियम १७ फेब्रुवारी २०२५ पासून लागू करण्यात आलेत.

  • FASTag ब्लॅकलिस्टेड झाला आणि तो एका तासापेक्षा जास्त काळ तसाच राहिला तर टोल प्लाझावर पैसे भरता येणार नाहीयेत .
  • जर एखाद्या वाहनाचा FASTag १५ मिनिटांत टोल शुल्काची प्रक्रिया करू शकला नाही, तर अतिरिक्त शुल्क भरावा लागणार.
  • जर टोल प्लाझावर टॅग स्कॅन केल्यानंतर १० मिनिटांच्या आत FASTag रिचार्ज केला तर, तो दंड परत करण्याची विनंती करू शकतो. त्याच वेळी, जर FASTag चुकीच्या पद्धतीने ब्लैकलिस्ट केल गेल किंवा खात्यात शिल्लक असूनही रक्कम कापली तर बँक १५ दिवसात ते रिफंड करेल.
  • वापरकर्त्याला FASTag ब्लॅकलिस्ट करण्यापूर्वी ७० मिनिट मिळणारेत, जेणेकरून तो त्याच्या FASTag मध्ये शिल्लक रक्कम जोडून, दुप्पट टोल आकारणी टाळू शकणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : पूनम सुपेकर – जठार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा