मुंबई, 28 जून 2022: मुंबईत चार मजली इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता आहे. कुर्ल्यातील नाईक नगरमध्ये हा अपघात झाला. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
मुंबईतील कुर्ला येथील नाईक नगर येथे चार मजली इमारत कोसळली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, ढिगाऱ्याखाली 20-25 लोक अडकले असण्याची शक्यता आहे. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी हजर आहेत. बचाव कार्यात आतापर्यंत 5 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे.
ढिगाऱ्याखालून 5 जणांना बाहेर काढण्यात आलं
कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की, ढिगाऱ्याखालून 5 जणांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या चारही इमारतींना बीएमसीने नोटीस दिली होती. तरीही काही लोक तिथे राहत होते. सर्व लोकांना काढून टाकणं हे पहिलं प्राधान्य आहे. मंगळवारी सकाळी मिळून लोकांना बाहेर काढलं जाईल आणि पाडण्यात येईल. त्यांनी लोकांना आवाहन केलं आहे की, जेव्हा जेव्हा बीएमसी नोटीस देईल तेव्हा त्वरीत जागा रिकामी करा, जेणेकरून अशी घटना घडू नये.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे