राज्यात काल दिवसभरात ४ हजार ८३१ नवीन करोनाबाधित; १२६ रूग्णांचा मृत्यू

मुंबई, २९ ऑगस्ट २०२१: राज्यात काल ४,८३१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार ४५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ५९ हजार ९०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,५२,२७३ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३७०२६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेल आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,३४,५६,४०३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,५२,२७३ (१२.०७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,९२,५३० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर २,३५७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५१,८२१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबईत गेल्या २४ तासात ३८८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या २४ तासात ३८८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत ७,२१,७५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट ९७ टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या २४ तासात चार रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत २९७४ सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर १७१३ दिवसांवर गेला आहे.
देशातील रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा पन्नास हजारांकडे, ५०९ जणांचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ४६ हजार ७५९ रुग्णांची भर पडली असून ५०९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासात ३१ हजार ३७४ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी शुक्रवारी देशात ४४ हजार ६५८ नव्या रुग्णांची भर पडली होती तर ४९६ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा