गोल पोस्ट महाराष्ट्र थरारक बस अपघातातून ४० प्रवासी बचावले; पुलाच्या कठड्यात अडकली होती बस

थरारक बस अपघातातून ४० प्रवासी बचावले; पुलाच्या कठड्यात अडकली होती बस

वर्धा, २९ ऑक्टोबर २०२२: वर्धा जिल्ह्याच्या आर्वी-वर्धा मार्गावरील येळाकेळी येथे अचानक एका बस चालकाचा ताबा सुटल्याने बस थेट पुलाच्या कठड्याला अडकली. बस थोडक्यात खाली कोसळतांना वाचली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ही बस वर्ध्याहून आर्विला येथे जात असताना या बस मध्ये ४० प्रवासी होते.

बस चालकाचा ताबा सुटल्याने बस थेट पुलाच्या कठड्याला धडकली. बसचा पुढचा भाग पुलाखाली गेला. सुदैवाने या अपघातातील सर्व प्रवासी सुखरुप असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र या अपघातात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी सर्व प्रवासींना बाहेर काढण्यात मदत केली.

जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या घटनेनंतर बसमधील प्रवासी आणि चालकामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे वाहतुक विस्कळीत झाली होती.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version