गोल पोस्ट आरोग्य पुणे विभागातील ४१० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी : डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे विभागातील ४१० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी : डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि.२ मे २०२० : पुणे विभागातील ४१० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या २ हजार ८७ झाली आहे. त्यात ॲक्टीव रुग्ण १ हजार ५६६ आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण १११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ७८ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

विभागात २ हजार ८७ बाधित रुग्ण असून १११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात १ हजार ८७६ बाधीत रुग्ण असून १०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात ५४ बाधीत रुग्ण असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात १११ बाधित रुग्ण असून ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात ३२ बाधित रुग्ण असून १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात १४ बाधित रुग्ण असून १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण २१ हजार ५९९ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी २० हजार ७६७ चा अहवाल प्राप्त झाला आहे. प्राप्त अहवालांपैकी१८ हजार ६१३ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून २ हजार ८७ चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील ६९ लाख ४ हजार ९१८ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत २ कोटी ६८ लाख ५६ हजार ९१८ व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी १ हजार ५९० व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version