नवी दिल्ली, दि. २२ जुलै २०२०: भारतीय जनता पक्षाचे ज्योतिरादित्य शिंदे, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राज्यसभेच्या ४४ खासदारांनी आज शपथ घेतली. राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्या समोर आज राज्यसभेत नवीन सदस्यांनी शपथ घेतली आहे. शपथविधी सोहळ्यादरम्यान सामाजिक अंतरांची काळजी घेण्यात आली.
एकूण ६१ खासदार शपथ घेणार आहेत, त्यापैकी ४४ खासदारांनी आज शपथ घेतली. शपथ घेणाऱ्यांमध्ये ज्योतिदित्य शिंदे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा समावेश आहे. ज्योतिरादित्य शिंदे हे आता भाजपचे राज्यसभेचे खासदार झाले आहेत.
हे ४३ सदस्य पहिल्यांदाच निवडले गेले……
राज्यसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांपैकी भाजपा १७, काँग्रेसचे ९, जेडीयूचे ३, बीजेडी आणि वायएसआर काँग्रेसचे प्रत्येकी चार, एआयएडीएमके आणि द्रमुकचे प्रत्येकी तीन, राष्ट्रवादी, आरजेडी आणि टीआरएस दोन आणि उर्वरित जागा इतरांनी जिंकल्या. या नवीन सदस्यांपैकी ४३ प्रथमच निवडून आले आहेत, उर्वरित सदस्य पुन्हा राज्यसभेत परत आले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी