केजरीवालांच्या शासकीय निवासस्थानाच्या नुतनीकरणासाठी ४५ कोटींचा खर्च

नवी दिल्ली, २६ एप्रिल २०२३: राजधानी दिल्लीत सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सिव्हिल लाईन येथील मुख्यमंत्री निवासच्या नूतनीकरणासाठी अरविंद केजरीवाल यांनी जवळपास ४५ कोटी खर्च केल्याचा आरोप भाजपने केलाय. भाजप नेते संबित पात्रा यांनी त्यामुळे नैतिकतेच्या आधारे केजरीवालांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आज सकाळी करण्यात आलीय.

दिल्ली कोरोना महारोगराई सारख्या संकटाचा सामना करीत होती तेव्हा केजरीवालांच्या शासकीय निवासस्थानाच्या नुतनीकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला होता, असा आरोप देखील पात्रा यांनी केला. कोरोना महारोगराईचा प्रकोप वाढत असतांना, लोकांचा मृत्यू होत असतांना अरविंद केजरीवाल त्यांच्या बंगल्याच्या डागडुजीत व्यस्त होते. यादरम्यान केजरीवाल यांनी त्यांच्या शीशमहालसाठी कोट्यवधींचा खर्च केला. असा आरोप पात्रा यांनी केलाय.

मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान ७० ते ८० वर्ष जुनं आहे. १९४२ मध्ये ही वास्तू उभारण्यात आली होती. राज्य सरकारच्या पीडब्लूडी विभागाने बंगल्याच्या जीर्णोद्धाराची शिफारस केली होती, याच शिफारसच्या आधारे हे काम करण्यात आल्याची स्पष्टोक्ती आप खासदार राघव चढ्ढा यांनी ही माहिती दिलीय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा