महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता

7

मुंबई, 27 सप्टेंबर 2021: चक्रीवादळ ‘गुलाब’ रविवारी संध्याकाळी किनारपट्टी भागात धडकून सुरू झाले, ज्यामुळे उत्तर किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि दक्षिण किनारपट्टी ओडिशामध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. मात्र, आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलममध्ये जोरदार लाटांमुळे 5 मच्छीमार समुद्रात पडले.

‘गुलाब’ ची लँडफॉल प्रक्रिया रविवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास सुरू झाली. त्यानंतर आंध्र प्रदेशातील कलिंगपट्टणम आणि ओडिशामधील गोपालपूर दरम्यानच्या किनारी प्रदेशात क्लाउड बँडने प्रवेश केला. पुढील दोन ते तीन तास ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सांगितले. यामुळे दक्षिणेकडील गंजम, गजपती, कंधमाल, रायगडा, नबरंगपूर, कोरापुट आणि मलकानगिरी तसेच केंद्र किनारा, कटक, जगतसिंगपूर, खुर्दा, पुरी आणि नयागढ या मध्यवर्ती किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.

महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता

पुढील 2-3 दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे 27 तारखेला विदर्भ आणि मराठवाडा, तर 28 तारखेला मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोबतच वाऱ्यांचा वेगही जास्त असण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन कुलाबा वेधशाळेतील वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. शुभांगी भूते यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा