येवला-लालसगाव मतदारसंघातील ४६ गावे आज कडकडीत बंद

लासलगाव, ४ सप्टेंबर २०२३: जालना घटनेच्या निषेधार्थ येवला-लालसगाव मतदारसंघातील ४६ गावे आज बंद पाळणार आहेत. सकाळपासून लालसगाव येथे देखील कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. शहरातील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली आहे.

रविवारी माजी आमदार कल्याणराव पाटील व लालसगाव सरपंच जयदत्त होळकर यांच्या अध्यक्षतेखालील मराठा संघाच्या बैठकीत बंदचा निर्णय घेण्यात आला. ‘जो देईल आमच्याकडे लक्ष, तोच आमचा पक्ष’ यावर आधारित मराठा समाजासह इतर समाजही पाठिंबा म्हणून या बंदमध्ये सहभागी झाला आहे.

सकाळी विंचूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ महाआरती करून बंदला सुरुवात होईल. त्यानंतर मोर्चा लालसगाव येथील ग्रामदैवत भगरी बाबा मंदिराजवळ येऊन त्यानंतर पोलीस स्टेशनला निवेदन देणार आहे. यावेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात येईल. असे सांगण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा