आज पासून सुरू होणार नवीन मारुती बलेनोची बुकिंग, लॉन्चिंग पूर्वी समोर आली ही माहिती

पुणे, 1 फेब्रुवारी 2022: देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीचं लोकप्रिय मॉडेल बलेनोच्या नवीन आणि फेसलिफ्टेड व्हर्जनची लोक खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. मात्र, आता समोर येत असलेल्या वृत्तानुसार या कारची तुमची प्रतीक्षा संपणार आहे. नवीन माहितीनुसार, कंपनी पुढील महिन्यात बलेनो फेसलिफ्ट लाँच करणार आहे आणि त्याची बुकिंग लवकरच सुरू होणार आहे.

या दिवशी लॉन्च केली जाऊ शकते कार

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनी 10 फेब्रुवारीला मारुती सुझुकी फेसलिफ्ट लॉन्च करू शकते. या लोकप्रिय कारच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल, तर तुम्ही 1 फेब्रुवारी 2022 पासून ती बुक करू शकता. याचा अर्थ आजपासून तुम्ही कार बुक करू शकाल.

नवीन मॉडेलमध्ये हे असेल विशेष

नवीन मॉडेलबद्दल लीक झालेल्या माहितीनुसार, मारुती बलेनो 2022 मध्ये नवीन आणि रुंद ग्रिल तसेच चांगले हेडलॅम्प मिळतील. यासोबतच नवीन मारुती सुझुकी बलेनोमध्ये HUD, ESP, 6 एअरबॅग्ज आणि वायरलेस चार्जिंग सुविधा यासारख्या प्रीमियम वैशिष्ट्यांसह येण्याची अपेक्षा आहे.

मारुतीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारपैकी एक असलेल्या बलेनोच्या अद्ययावत आवृत्तीमध्ये फ्रंट बंपर, एलईडी सिग्नेचरसह नवीन स्प्लिट टेललाइट्स, ड्युअल टोन अॅलॉय व्हील आणि सुधारित रियर बंपर देखील मिळतील.

केला जाईल या वैशिष्ट्यांचाही समावेश

कारच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये टोयोटाने विकसित केलेली फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, हेड्स अप डिस्प्ले, वायरलेस चार्जिंग सुविधा, क्रूझ कंट्रोल, पुश-बटण इंजिन स्टार्ट/स्टॉप, नवीन एअर कंडिशनिंग व्हेंट्स यांचा समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा