पुणे, २ ऑगस्ट २०२३ : अंदमान निकोबार बेट समूहात आज बुधवारी, २ ऑगस्ट रोजी सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. या संदर्भात नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने माहिती दिली आहे की, आज पहाटे ५.४० वाजता निकोबार बेटांवर भूकंपाचे धक्के जाणवले. यासोबतच भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.० एवढी असल्याची माहितीही नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली. मात्र, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
२८ जुलै रोजीही दुपारी १२.५३ वाजता अंदमान- निकोबार बेटावर ५.८ तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते. पोर्ट ब्लेअरच्या दक्षिण – पूर्वेस १२६ किमी अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले. तेव्हा भूकंपाचा केंद्रबिंदू ६९ किमी खोलीवर होता.
या घटनेबाबत जर्मन रिसर्च फॉर जिओसायन्सेस (GFZ) च्या म्हणण्यानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये ६९ किमी खोलीवर होता. ज्यावेळी भूकंपाचे हे धोकादायक धक्के लोकांना जाणवले, त्यावेळी घरात झोपलेले सगळे अचानक घराबाहेर पळू लागले. मात्र, भूकंपामुळे जीवित व वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड