अंदमान निकोबारची जमीन मध्यरात्री हादरली, ५.८ रिश्टर स्केलचा भूकंप

पुणे, २९ जुलै २०२३: अंदमान-निकोबार बेटावर मध्यरात्री १२.५३ वाजता ५.८ रिश्टर स्केलचा भूकंपाचे धक्के जाणवले. पोर्ट ब्लेअरच्या दक्षिण-पूर्वेस १२६ किमी अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू ६९ किमी खोलीवर होता.

या घटनेबाबत जर्मन रिसर्च फॉर जिओसाइन्सेस (GFZ) च्या मते, भूकंपाचा केंद्रबिंदू अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये ६९ किमी खोलीवर होता. मात्र, या भूकंपामुळे अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. सरकार आणि प्रशासन या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अंदमान बेटे होता. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.८ इतकी मोजण्यात आली आहे. घरांमध्ये झोपलेल्या लोकांना भूकंपाचे धक्के जाणवताच सर्वजण घराबाहेर पळू लागले. मात्र, भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा