मेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या युवकानं ५ वर्षीय चिमुकलीवर केला बलात्कार

मुंबई, १ मे २०२१: राज्यात एकीकडं कोरोनाचं संकट आहे. तर दुसरीकडं गुन्हेगारी मधे देखील वाढ होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी अत्याचार वाढत असून आता  याचा सामना ही प्रशासनाला करावा लागणार आहे. महाराष्ट्रात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीम. जिथं ५ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार झाल्याची घटना मुंबईत घडलीयं.
मुंबईत मेडिकलेचं शिक्षण घेणाऱ्या एका वासनांध नराधमाने पाच वर्षीय मुलीवर बलात्कार केला. दरम्यान, ही मुलगी आरोपीच्या घरी टिव्ही पाहण्यासाठी गेली होती. या संधीचा फायदा घेत नरधमानं दरवाजा बंद करून त्या चिमुकलीचे लचके तोडले. मुलीनं घरी येऊन घडला प्रकार सांगितल्यावर हे प्रकरण समोर आलं.
गुरूवारी संध्याकाळी ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुनील  सुखाराम गुप्ता आरोपीचं नाव आहे. या घटनेमुळं मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. तर अश्या विकृतीमुळं मुली, महिलांबरोबरच आता लहान चिमुकलीच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा