महिलांना एसटीच्या तिकीट दरात ५०% सवलत आजपासून होणार अंमलबजावणी

6

पुणे, १७ मार्च २०२३ : शिंदे फडणवीस सरकारने महिलांनासाठी एसटीच्या दरात सवलत दिली आहे. याबाबतचा आदेश सरकारने काढला असून त्यांची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात राज्य सरकारने ७५ वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या तिकीट दरात १००% सवलत जाहीर केली होती.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यतील प्रवाशांसाठी जवळपास ३० प्रकारच्या सुविधा राज्य सरकारकडून देण्यात येतात. या सवलतीची शुल्क प्रतीपूती राज्य सरकारकडून महामडंळाला करण्यात येते. राज्य सरकारकडून ७५ वर्ष पूर्ण ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या एसटी बसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी अनेक घोषणा जाहीर केल्या. यातील महत्त्वाची घोषणा महिला सन्मान योजना या अंतर्गत महिलांनासाठी सरसकट एसटी प्रवासात ५०% सवलतीच्या दरात प्रवास करता येणार या बाबतची आदेश सरकारने काढला असून याची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय सपकाळ

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा