युरोपमध्ये 1 महिन्यात कोरोना रुग्णांमध्ये 50% वाढ; WHO चा इशारा- फेब्रुवारीपर्यंत 5 लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता

पुणे, 6 नोव्हेंबर 2021: युरोपमध्ये कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांनी सर्वांनाच चिंतेत टाकलंय.  जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी सांगितले की युरोपमध्ये गेल्या महिन्यात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये 50% वाढ झालीय.  तसंच, लसीचा पुरवठा असूनही ते कोरोनाचं केंद्र बनत आहे.
 डब्ल्यूएचओचे आपत्कालीन प्रमुख डॉ मायकेल रायन म्हणाले, “युरोपमध्ये पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध आहे.  परंतु लसीचं वितरण एकसमान झालेलं नाही.  एवढंच नाही तर लसीकरणातील ही तफावत कमी करण्याचं आवाहन त्यांनी युरोपीय प्रशासनाला केलं.  तथापि, डब्ल्यूएचओ प्रमुख अधानोम गेब्रेयसस म्हणाले, ज्या देशांनी त्यांच्या लोकसंख्येच्या 40 टक्के लसीकरण केलं आहे त्यांनी आता ही लस विकसनशील देशांना दान करावी, जिथं त्यांच्या नागरिकांना लसीचा पहिला डोसही मिळालेला नाही.
इतकेच नाही तर डब्ल्यूएचओ प्रमुख म्हणाले होते की, इम्युनो-कॉम्प्रोमाइज्ड लोकांशिवाय कोणालाही बूस्टर डोस देऊ नये.  कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी 60 हून अधिक देशांनी बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे.  त्याच वेळी, पुढील आठवड्यापासून अमेरिकेत 5-11 वर्षांच्या मुलांना लस देण्याची योजना आहे.
 प्रकरणांमध्ये होणारी वाढ ही चिंतेची बाब – WHO
 याआधी गुरुवारी डब्ल्यूएचओच्या युरोप विभागाचे प्रमुख डॉ. हंस क्लुगे म्हणाले होते की, कोरोनाच्या प्रकरणांमध्ये होणारी वाढ ही गंभीर चिंतेची बाब आहे.  ते म्हणाले होते, युरोप पुन्हा महामारीच्या केंद्रस्थानी आला आहे, जिथे आपण एक वर्षापूर्वी होतो.  त्यांनी चेतावणी दिली की, कोरोनाव्हायरस रूग्णांच्या रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण गेल्या आठवड्यात दुप्पट झालंय.
 फेब्रुवारीपर्यंत युरोपमध्ये 5 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला.  हेन्स म्हणाले, या आठवड्यात युरोपमध्ये 1.8 दशलक्ष प्रकरणे नोंदवली गेली आहेत.  हे गेल्या वर्षीच्या तुलनेत 6% अधिक आहेत.  त्याच वेळी, कोरोनामुळे या आठवड्यात 24000 लोकांचा मृत्यू झालाय.  गेल्या आठवड्याच्या तुलनेत हे 12% अधिक आहे.
 युरोपमध्ये सलग पाचव्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.  युरोपमध्ये 1 लाख लोकांवर 192 प्रकरणं नोंदवली जात आहेत.  स्वीडनचे मुख्य महामारी तज्ज्ञ अँडर टेगनेल म्हणाले, आपण कोरोनाच्या लाटेत आहोत.  वाढलेला प्रसार पूर्णपणे युरोपमध्ये केंद्रित आहे.  मध्य आणि पूर्व युरोपमधील अनेक देशांमध्ये अलिकडच्या आठवड्यात दररोजच्या प्रकरणांमध्ये वाढ झालीय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा