पुणे, दि.६ मे २०२० : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मार्गदर्शनाखाली आकुर्डी येथील डॉ. डी. वाय.पाटील फार्मसी कॉलेजमधील रासेयोअंतर्गत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनी मास्कची निर्मिती केली असून त्याचे मोफत वाटप देखील करण्यात येत आहे. या कोरोना जनजागृती उपक्रमात ७५ विद्यार्थी सहभागी झालेले आहे. यापैकी ५० विद्यार्थ्यांनी ५०० कुटुंबाना जनजागृतीसाठी दत्तक घेतलेले आहे.
या दरम्यान विद्यार्थी या नागरिकांना सरकारचा “आरोग्य सेतू ” आणि “आय गॉट दिशा ॲप” डाऊनलोड करण्याचे आवाहन विद्यार्थी नागरिकांना करीत आहेत. रासेयोच्या विद्यार्थ्यानी दत्तक घेतलेल्या कुटुंबीयांच्या लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या असणाऱ्या समस्या जाऊन घेणे आणि त्यांचे निवारण करणे तसेच घरातील ज्येष्ठ नागरीकांना मानसिक आधार देणे हे सर्व कार्य प्रत्यक्ष घरी न जाता फोनद्वारे केले जात आहे.
या विद्यार्थ्यांकडून पोस्टर बनवून त्यावर विविध प्रकारच्या घोषणा लिहून जनजागृती करणे, रासेयोच्या अंतर्गत घरच्या घरी मास्क बनवणे व वाटप करणे, रुग्णांना रक्त पुरवठा कमी पडू नये यासाठी रक्तदात्याची माहिती संकलित करणे, विविध व्हिडिओ बनवून व्हॉट्सॲप, फेसबुक या सोशल मीडिया मार्फत त्यांना कानाकोपऱ्यात पोहचवणे असे जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येत आहे. हे सर्व विद्यार्थी कोरोनाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
या उपक्रमासाठी कार्यक्रम अधिकारी डॉ. देवेंद्र शिरोडे व तसेच फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.निरज व्यवहारे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर