मुंबई, पुण्यात होणार ५ हजार ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचण्या…..

पुणे, दि. २४ जुलै २०२०: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनेकाने तयार केलेल्या कोरोना लसीची चाचणी भारतात सुरू होण्याची इच्छा सीरम इन्स्टिट्युटचे पुनावाला यांनी व्यक्त केली होती तर आता ही चाचणी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस भारतात सुरू होणार असल्याचे समजले आहे. या लसीच्या मानवी चाचणीसाठी मुंबई आणि पुण्याच्या हॉटस्पॉट भागांतील तब्बल ४ ते ५ हजार स्वयंसेवकांची निवड करण्यात आली असून सर्व काही व्यवस्थित राहिले, तर पुढील वर्षी जून महिन्यापर्यंत लस लॉन्च करण्यात येईल अशी आशा लसीचे स्थानीय उत्पादक सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) व्यक्त केली आहे.

एसआयआयचे सीईओ अदार पूनावाला यांनी सांगितले, लसीच्या चाचणीसाठी आम्ही मुंबई आणि पुण्यात काही जागा ठरवल्या आहेत. या शहरांत कोरोनाचे सर्वात जास्त हॉटस्पॉट आहेत. यामुळे आम्हाला लस किती प्रभावशाली आहे, याचे आकलन करण्यास मदत होईल.’

मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा १ लाखच्या वर असून पुण्यात बुधवारपर्यंत तब्बल ५९,००० हून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांपैकी अर्धे रुग्ण केवळ या दोन शहरांतीलच आहेत.

भारतीय औषध नियंत्रकांकडून परवानगी मिळताच ऑगस्टमध्ये लसीच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात केली जाणार असून. कंपनी चाचणी सुरू करण्यासाठी दोन दिवसांच्या आत औषध नियंत्रकांकडे लायसंन्ससाठी अर्ज करेल. तेथून एक ते दोन आठवड्यांत मंजुरी मिळेल अशी आशा आहे. यानंतर साधारणपणे तीन आठवडे स्वयंसेवकांना रुग्णालयांत आणण्यासाठी लागतील. अशा प्रकारे एक ते दीड महिन्यांत चाचणीला सुरुवात होईल असे सांगण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

एक प्रतिक्रिया

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा